ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला इशारा!

pankaja munde

औरंगाबाद : ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा निघतो तेव्हा हे षडयंत्री मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. औरंगाबादेत भाजपकडून आज ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ५० टक्क्यांच्या खालचे आरक्षणही संपुष्टात आले आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आधीच अध्यादेश काढला असता तर या निवडणुकीत त्याचा फायदा झाला असता. जर ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. माझे सरकारला आवाहन आहे, अध्यादेश टिकवून दाखवा आणि त्यानुसार निवडणूक घेऊन दाखवा.

ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही रोज जात काढत होता त्याच मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण दिलं, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. मात्र पंकजा मुंडे यांनी यावेळी कुणाचेही नाव न घेता हल्ला चढवला. नेमका त्यांचा रोख कुणाकडे होता हे समजले नाही. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निघाला की काही लोक मराठा आरक्षणाचा मुद्दा उकरून काढतात. मात्र मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम कोणी केले हे देखील पाठीमागे वळून पाहावे. त्याचप्रमाणे संतांच्या या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या