मोदी सरकारला इशारा नाही तर शाप देतोय : जयदेव गल्ला

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. मोदींनी आंध्र प्रदेशवर अन्याय केलाय, आम्ही मोदी सरकारला इशारा नाही तर शाप देतोय असं म्हणत टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला यांनी भाजपवर टीका केली आहे.

जयदेव यांनी उर्वरित भाषणामध्ये केंद्र सरकारच्या कामावर बोलण्याऐवजी आंध्र प्रदेशच्या स्थितीवर बोलणे पसंत केले. आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मागत आहोत. काँग्रेसने तेलगू तल्लीचे दोन तुकडे केले असा थेट आरोप त्यांनी केला. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशला वाचवण्याची भाषा केली होती म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो होतो. मात्र त्यांनी नंतर आपले आश्वासन पाळले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहे.दरम्यान, अविश्वास ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

चर्चेसाठी कुणाला किती वेळ?

भाजप – 3 तास 33 मिनिटं

काँग्रेस – 38 मिनिटं

अण्णा द्रमुक – 29 मिनिटं

तृणमूल काँग्रेस – 27

शिवसेना- 14 मिनिटं

टीडीपी- 13 मिनिटं
तेलंगणा राष्ट्र समिती – 9 मिनिटं

लोकसभेत मोदी सरकारची परीक्षा, अविश्वास प्रस्ताव मांडण्यास अध्यक्षांची मंजुरी

भारत आता जगामध्ये महिलांसाठी असुरक्षित देश – जया बच्चन