रोहित नाही तर ‘या’ खेळाडूला कॅप्टन करा, गावसकरांचा सल्ला

rohit

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू व संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेवर पडदा पडला आहे. विराट कोहलीने ट्विटरवरून टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर T20 टीमचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली आहे.

विराट कोहलीने T20 विश्वचषक स्पर्धा तोंडावर आलेली असताना कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं आणि क्रिकेट जगतात खळबळ उडाली. विराटने स्वतःला थोडी स्पेस देऊ इच्छित असल्याचं सांगत T20 टीमचं कर्णधारपद सोडणार असल्याचं स्पष्ट केलं. विराटनंतर टीम इंडियाचं नेतृत्व उपकर्णधार म्हणून कार्यरत असलेल्या रोहित शर्माकडे येणार असल्याची चर्चा आहे.

विराटच्या राजीनाम्या नंतर टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर यांनीही यावर भाष्य केलं आहे. तसेच विराटच्या नंतर कोणाला कॅप्टन केलं पाहिजे याबाबत देखील त्यांनी निवड करण्याचा सल्ला निवड समितीला दिला आहे. गावसकरांनी बीसीसीआय भविष्याचा विचार करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. असं म्हणत त्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूच नाव घेतलं आहे.

भारत नव्या कॅप्टनला तयार करण्याचा विचार करत असेल तर त्यासाठी केएल राहुलचा विचार होऊ शकतो. त्यानं चांगली कामगिरी केली आहे. तसेच इंग्लंडमध्येही त्यानं चांगली बॅटींग केली आहे. तो आयपीएल, वन-डे क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करत आहे, त्याला कॅप्टन केले जाऊ शकते.’राहुल आयपीएलमध्ये पंजाब किंग्स टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टनसीचा प्रभाव त्याच्या बॅटींगवर पडलेला नाही, असंही गावसकरांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या