‘गरज पडली तर १८ तास काम करेल, पण महाराष्ट्र चूकीच्या हातात जाऊ देणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद यांनी देखील मोर्चेबांधणीला, दौऱ्याला सुरुवात केली आहे.

याच पार्श्वभूमीवर कल्याण रिसॉर्ट इथे शरद पवार यांची सभेत यावेळी बोलत होते. यावेळी पवारांनी सरकारवर टीका केली. यावेळी पवार म्हणाले, काही लोक मला वयस्कर झालो म्हणतात. मी त्यांना विचारतो काय बघितलं तुम्ही. मी नाशिकपासून ते हिंगोलीपर्यंत फिरून आलोय. गरज पडली तर सोळा नाही अठरा तास काम करेल. पण हा महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ देणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

Loading...

तसेच पवारांनी भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला. याबाबत बोलताना पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज दिल्लीला गेले. पण औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा उचित सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि आता…?,” असं म्हणत उदयनराजे यांनी टोला लगावला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, पक्षांतरावर भाष्य करताना ‘ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. पण आपले सरकार आल्यावर त्यांना आपल्याकडे घ्या असं तुम्ही म्हणू नका. मी तर कुणाला परत पक्षात घेणार नाही. पण तुम्ही येऊन सांगू नका, दादा घ्या हो पदरात पाडून. अरे आपला पदर फाटला, पदरात पाडून घेता-घेता असं विधान केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार