‘माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाही तर…’; रितेशचा खुलासा

ritesh deshmukh

मुंबई : बॉलीवुडमधील सर्वात ‘क्युट कपल’ म्हणजे रितेश-जेनेलिया. हे दोघेही सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असतात. रितेश-जेनेलिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोवर लाईक आणि कमेंटचा नुसता पाऊस पडतो. रितेश आणि जेनेलियाच्या प्रेमाची नेहमीच चर्चा होत असते. मात्र नुकताच रितेशने आपल्या पत्नीबद्दल केलेलं एक ट्वीट चांगलेच चर्चेत आलं आहे.

पत्नीच्या वाढदिवसाचं निमित्त रितेशने एक ट्वीट केलं आहे. यामध्ये रितेशने म्हटलं आहे, ‘माझ्या बायकोचं नाव जिनिलिया आहे, जेनेलिया नाही’. सोशल मीडियावर काही बरेच लोक जिनिलियाचं नाव जेनेलिया असं लिहितात. ही बाब लक्षात घेत रितेशने ट्वीट करत ही चूक सुधारण्याचा सल्ला दिला आहे. त्याचे हे ट्वीट सध्या तूफान व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या  प्रतिक्रिया येत आहेत ‘जेनेलिया असो किंवा जिनिलिया ती तुझी बायको आहे हेचं सत्य आहे’, असेही काही नेटकऱ्यांनी म्हंटले आहे.

आज जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितशने एक खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. इनस्टाग्राम अकाऊंटवर रितेशने एक पोस्ट शेयर करत ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको!’, असे लिहिले आहे. तर पुढे एक व्हीडीओ शेयर करत लिहितो,  तू दिवसेंदिवस आणखीनच तरुण दिसत आहे. लवकरच लोक म्हणतील, जिनिलिया सोबत हा काका कोण आहे?’. यावर अनेक लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत असून चाहत्यांनी जिनिलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या