‘मुस्लीम काँग्रेसला मतदान करतात,हिंदू मतदारांनी भाजपला मतदान करावे’

टीम महाराष्ट्र देशा- राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी आपल्यालाच मतदान करावे यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि राज्यमंत्री धनसिंह रावत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. सर्व मुस्लीम जर काँग्रेसला मतदान करु शकतात तर हिंदू एकजुट होऊन भाजपाबरोबर का येऊ शकत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.एका संमेलनात उपस्थितांसमोर धनसिंह रावत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले रावत ?
मुस्लीम काँग्रेसबरोबर जाऊन त्यांना एकगठ्ठा मतदान करु शकतात. तर सर्व हिंदू एकत्र येत भाजपाबरोबर का येऊ शकत नाहीत. केवळ हिंदुच भाजपाला प्रचंड बहुमत मिळवून देऊ शकतात. कोणत्याही परिस्थिती मुसलमान काँग्रेसला मतदान करु शकतात. सर्व हिंदू एकत्रित येत भाजपाला पूर्ण बहुमताने निवडून देऊ शकतात.काँग्रेसचा अर्थच मुसलमान आहे. प्रत्येक मुसलमानाने काँग्रेसला मतदान केले आहे. राजस्थानमधील जितके हिंदू आहेत त्यांनी एकत्र येत भाजपाला मतदान केले पाहिजे.

महिलांचा समावेश होईल त्यादिवशी RSS हे ‘RSS’ राहणार नाही : राहुल गांधी

‘तस्लीमा नसरीन मोदींची बहीण होऊ शकतात तर मग रोहिंग्या त्यांचे भाऊ होऊ शकत नाहीत का?’ ओवैसी

संघ मुक्त भारताचा नारा देणारे नितेशकुमार व संघ प्रमुख लवकरच एका मंचावर.