मुंबईचा खेळ खालावला तर ‘हा’ संघ कोरणार आयपीएलच्या चषकावर आपले नाव

आयपीएल

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील यशानंतर भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. यावर्षीचा आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्यात होणार आहे. या मोसमातही मुंबईची टीम भक्कम असून पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठीची प्रबळ दावेदार आहे. यंदाची आयपील ट्रॉफी जिंकुन मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये हॅट्रीक साधण्याच्या दृष्टीने उतरणार आहे. आणि कर्णधार रोहित शर्माही यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. मुंबई इंडियन्सने सलग पाचवेळी ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे आता यावर्षी देखील मुंबईचा संघ जेतेपदाची मिळणार असे मत चाहत्यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने ट्विट करून मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही आयपीएलचे जेतेपद पटकवणार असं म्हंटले आहे. मायकल वॉन  ट्विट करून म्हणाला, ‘मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही आयपीएलचे जेतेपद पटकावेल असे मला वाटते.अचानक मुंबईचा खेळ खालावला आणि त्यांनी निराशाजनक कामगिरी केली, तर सनरायजर्स हैदराबाद संघ आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरू शकेल.’

मात्र, मुंबई इंडियन्सचा संघ यंदा जेतेपद पटकावणारच असा विश्वास लेगस्पिनर राहुल चहरने व्यक्त केला. आम्ही जेतेपदाचा षटकार मारू याचा मला विश्वास आहे. आमचे सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी मागील काही काळात दमदार कामगिरी केली आहे.

मुंबईचा संघ : 

(कॅप्टन) रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, धवल कुलकर्णी, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरान पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेन्ट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, पियुष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग, जेम्स नीशम, अर्जुन तेंदुलकर, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग

महत्वाच्या बातम्या