टीम महाराष्ट्र देशा : ” कट्टर इस्लामिक लोक जास्त मुलांना जन्म देत आहेत, यातून त्यांची मुले दहशतवादीच बनणार. भाजपाचे माजी खासदार रामविलास वेदांती यांनी असे वादग्रस्त विधान केले आहे. विजयादशमीनिमित्त श्रीराम यात्रेमध्ये ते इटावामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
इतकेच नव्हे तर ” आम्ही लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा बनवू. तर सपा, बसपा आणि काँग्रेस हे दहशतवाद्यांसोबतच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. देशामध्ये विशिष्ट वर्गाची संख्या वाढत चालली आहे. देशात असे कट्टर इस्लामिक लोकं आहेत, जे एक नाही तर चार लग्न करतात आणि नंतर घटस्फोट देतात. अयोध्येच्या बाजूला टांडा येथे एका व्यक्तीने ४० विवाह केले आणि १०७ मुलांना जन्म दिला. एक व्यक्ती जर १०७ मुलांना जन्म देत असेल तर ते दहशतवादीच बनणार ना ? असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
कॉंग्रेस, सपा आणि बसपाने दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप वेदांती यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची तुलना श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याशी केली. ते म्हणाले की, सत्तर वर्षांपासून देशातील देशद्रोही कॉंग्रेस नेते जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी उभे करत होते. सध्याच्या कलियुगातील राम आणि लक्ष्मण हे मोदी आणि अमित शाह हे त्यांनी जशी लंका जिंकली तशी मोदी आणि शहा कश्मीर जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
'पीएमसी बँकेच्या ग्राहकांनी शाखेबाहेर लिंबू लावा' https://t.co/MmcPIREWKy via @Maha_Desha
— Maharashtra Desha (@Maha_Desha) October 9, 2019
आणखी एक नेता पंकजा मुंडेंच्या गळाला, असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश https://t.co/vX76xT9grW via @Maha_Desha
— Maharashtra Desha (@Maha_Desha) October 9, 2019