मोदिजी पुन्हा परदेश दौऱ्यावर जाल तर ‘दुसऱ्या’ मोदीला परत घेऊन या- राहुल गांधी

Modi vs rahul gandhi

मेघालय: पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या घोटाळ्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगलेच चिमटे काढले. राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी खूप वेळा परदेश दौऱ्यावर जात असतात. यानंतर परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर जनतेचा पैसा लुटून परदेशात पळालेल्या ‘दुसऱ्या’ निरव मोदीला परत घेऊन यावे. मंगळवारी मेघालय येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि नीरव मोदी यांच्यात तुलना केली. नीरव मोदी याने केलेल्या घोटाळ्यात सरकारचाही सहभाग आहे. नीरव मोदी हिरे विकतो. हिऱ्यांना आपण स्वप्नातील वस्तू म्हणतो. खरे तर त्याने अनेक लोकांची स्वप्ने विकली आहेत.

काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय जनतेला स्वप्ने विकली होती. त्यात ‘अच्छे दिन’चे स्वप्न होते. बँक खात्यात १५ लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्यांसह अनेक स्वप्नांचा त्यात समावेश होता. असेही राहुल गांधी म्हणाले.