मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. मोदी जर पुन्हा भारताचे पंतप्रधान झाले तर पाकिस्तानात फटाके फुटतील अशा आशयाच ट्वीट त्यांनी केलं आहे.

आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात ‘पाकिस्तान मोदींना का पाठींबा देत आहे ? मोदींनी देशाला सांगावं की पाकिस्तानसोबत त्यांचे किती खोलवर संबंध आहेत ? तसेच संपूर्ण जनतेने लक्षात घ्याव की जर मोदी जिंकले तर पाकिस्तानात फटाके फुटतील’ असं अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे.

 

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदीच भारताचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती कारण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शांततेच्या चर्चा यशस्वी होतील असं इम्रान खान याचं म्हणणं आहे.