…तर ही वेळ आली नसती; अमित शाहांची कबुली

amit shaha

मुंबई : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष ऑनलाइन कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती, अशी कबुली दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘मरकजमध्ये वर्षभर असे कार्यक्रम होत असतात. तो सार्वजनिक कार्यक्रम नव्हता तर मरकजच्या आतमध्ये होता. त्यामुळे मला वाटतं की, जर आम्ही वेळेवर हा कार्यक्रम रोखला असता आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या असत्या तर कदाचित ही वेळच आली नसती" असं शहा यांनी म्हटलं आहे.

तसेच ‘संपूर्ण देशचं कोरोना विषाणू बरोबर लढत आहे. लोकांनी जनता कर्फ्यू, थाली वाजवून आणि करोना योद्ध्यांचा सन्मान करुन देशाला या महामारीविरोधात मजबूत केले,’ असं भाष्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं.

दरम्यान, गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 8,380 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,82,143 वर पोहोचली आहे.