लॉकडाऊन वाढला तर ते अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल : आनंद महिंद्रा

aananad mahindra

मुंबई : कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने देशात 17 मेनंतर लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. यावर आता व्यवसायिक आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.लॉकडाऊन दीर्घ कालावधीसाठी वाढविण्यात आला तर देशाचं मोठं आर्थिक नुकसान होणार असून, अर्थव्यवस्थेसाठी ते आत्मघातकी पाऊल ठरेल, अस आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, लॉकडाऊनने लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत, पण जर यात आणखी वाढ केली तर समाजाच्या (गोरगरीब आणि गरजू) खालच्या स्तरातील वर्गाला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जपानमधील युद्धात पराभूत झालेल्या योद्ध्यांनी युद्धबंदी होण्यापासून वाचण्यासाठी स्वत:च्या पोटात चाकू खुपसून आत्महत्या करण्याच्या पर्याय निवडला होता, त्या प्रथेला हारकिरी असे म्हटले जाते.

गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असल्याचं वाटत असतानाच नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. आपली लोकसंख्या आणि उर्वरित जगातील कोरोना संक्रमणाची कमी रुग्ण पाहिल्यास आपल्याकडे तपासण्या वाढल्या असल्या तरी संसर्ग होण्याच्या नवीन घटनांत वाढ होणे अपरिहार्य आहे. आम्ही आलेख तात्काळ खाली येईल, अशी आम्ही अपेक्षा करू शकत नाही, असही आनंद महिंद्रा म्हणाले.

महिंद्रा म्हणाले की, भारताने आपल्या कोरोना युद्धात कोट्यवधी संभाव्य मृत्यू टाळले आहेत. लॉकडाऊन दीर्घकाळ राहिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका आहे. वाढत्या धोक्यापासून अर्थव्यवस्थेला वाचवण्याची गरज असून, रुग्णालयातील ऑक्सिजन, पीपीई कीट सारखं सामान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं आहे. तसेच सामाजिक अंतराचं पालन करणंही आवश्यक आहे, असंसुद्धा आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.

दरम्यान तप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला सूचना देण्यास येणार आहेत. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : पंतप्रधान मोदी आज 8 वाजता जनतेशी साधणार संवाद, लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय ?

अशी आहे कोरोनाबाधितांची गेल्या 24 तासातली आकडेवारी, वाचा फक्त एका क्लिकवर !