fbpx

‘पंडित नेहरू ऐवजी जिन्ना पंतप्रधान झाले असते तर देशाचे तुकडे झाले नसते’

टीम महाराष्ट्र देशा :देशाचे पहिले पंतप्रधान जर मोहम्मद अली जिन्ना झाले असते तर देशाचे तुकडे झाले नसते. असे धक्कादायक विधान भाजपचे लोकसभेचे उमेदवार गुमानसिंह डामोर यांनी केले आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. याचदरम्यान भाजपचे लोकसभा उमेदवार गुमानसिंह डामोर यांनी आयोजित प्रचारसभेत धक्कादायक विधान केले आहे. कॉंग्रेस पक्षाची स्थापना केवळ इंग्रजाना मदत करण्यासाठी झाली होती. देशाचे तुकडे होण्यास केवळ कॉंग्रेस जबाबदार आहे. असे भाजपचे लोकसभेचे उमेदवार गुमानसिंह डामोर यांनी म्हंटले.

तसेच आधी प्रमाणेच कॉंग्रेस पक्षाची विभाजनकरी निती अजूनही सुरु आहे. काश्मीरची समस्या कॉंग्रेस पक्षाचीच देन आहे. असा आरोपही त्यांनी केला.इतकेच नव्हे तर, मोहम्मद अली जिन्ना एक उत्तम वकील आणि विद्वान व्यक्ती होते. जर त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हट्ट धरला नसता आणि देशाचे पहिले पंतप्रधान जर मोहम्मद अली जिन्ना झाले असते तर देशाचे तुकडे झाले नसते. असेही त्यांनी म्हंटले.