‘सुनील गावस्कर नसता, तर कदाचित म्हाडाचा प्लॉट…’; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट चर्चेत

jitendra avhad

मुंबई : भारतात क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ आहे. सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच क्रिकेट पाहायला आवडते. यातच टीम इंडियाचे सामने आवर्जून पाहिले जातात. यातच राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही क्रिकेट प्रेमाचा एक किस्सा ट्विटरवरुन शेअर केला आहे.

आव्हाड हे सुनील गावस्करच्या क्रिकेट खेळाचे मोठे चाहते होते. त्यामुळेच, त्यांनी सध्या गृहनिर्माण खात्याचा मंत्री म्हणून एका निर्णयास खास आपल्या लाडक्या माजी क्रिकेटर्ससाठी विरोध केला नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले. तसेच, सुनील गावस्कर हे खेळाडू म्हणून महान होतेच, पण त्यांनी आतातरी क्रिकेट अकादमी सुरु करावी, असे मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हान यांनी व्यक्त केले आहे. आव्हाड यांनी ट्विट करुन जुन्या आठवणींना उजाळा देत या निर्णयाचाी माहितीही दिली.

मुंबईतील बांद्रास्थित म्हाडाच्या प्लॉटवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. कित्येक वर्ष प्लॉट असूनही भारताचे माजी कर्णधार क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी तिथे क्रिकेट अकादमी सुरु केली नाही. त्यानंतर तो प्लॉट ताब्यात घेण्याची महाराष्ट्र सरकारने तयारी दाखवली. पण आता गावस्करांच्या विनंतीनुसार सरकारने तो प्लॉट त्यांच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र त्या प्लॉटवर लवकरात लवकर अकादमी सुरु करावी, अशी इच्छा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. यावेळी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी खास आठवणही सांगितल्या आहे.

बांद्र्याच्या प्लॉटवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. वास्तविक, हा भूखंड 31 वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांच्या ट्रस्टला देण्यात आला होता. परंतु दीर्घकाळ तिथे कोणतंही बांधकाम झालं नाही किंबहुना गावस्कर ट्रस्टने तिथे बांधकाम करण्याची हालचालही केली नाही. त्याचमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण ‘गावस्कर ट्रस्ट’ कडून तो प्लॉट परत घेऊ इच्छित होतं. पण सरकारी पातळीवर झालेल्या चर्चेअंती आता गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी संबंधित प्लॉट गावस्कर ट्रस्टकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तसं ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. मात्र हे ट्विट करताना जर त्यांच्या जागी दुसरं कुणी असतं तर हा प्लॉट मी रद्द केला असता, असं सांगायला देखील मंत्री जितेंद्र आव्हाड विसरले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या