हिंमत असेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्वतंत्र लढून दाखवाव – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकींचे वारे वेगाने वाहत असतानाच एकमेकांवर आव्हानांचा मारा देखील होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या महसूल मंत्र्यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढून दाखवाव असं खूल आव्हान दिल आहे.

सांगलीतल्या एका आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी “हिंमत असेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आगामी निवडणुकांमध्ये वेगवेगळे लढून दाखवावं” असे आव्हान शरद पवार आणि अशोक चव्हाण यांना दिले. तसेच आमच्यात कितीही भांडणे असली तरी भाजपला मित्रपक्षांना एकत्र घेऊनच लढावे लागते हाच भाजपचा विजय आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले.

२०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर राज्यामध्ये आघाडीची मोर्चेबांधणी जोमाने चालू आहे. तसेच  भाजप शिवसेना देखील तुझं माझं करत युती करण्याची शक्यता आहे आणि त्याबाबतचे संकेत देखील चंद्रकांत पाटलांनी दिले.