मुंबई : आदित्य ठाकरेही निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात फिरतायत. बंडखोरांवर आणि भाजपवरही उद्धव ठाकरे जोरदार टीका करतायत. सोबतच शिवसेना आपल्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचं प्रतिज्ञापत्र घेत आहे. अशात भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या अनेक वक्तव्यांचा समाचार घेतला आहे.
“सत्ता असताना फिरले असते तर, असे गठ्ठे करण्याची वेळ आली नसती” अशी बोचरी टीका प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. भाजप आमदार शिवसेनेवर टीका करत म्हणाले की, कुणी कुणाला संपवत नसतं, ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिलाय त्यांची प्रतारणा झाली की असं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादी ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा तिरस्कार केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा ही अधोगती झाली अशी बोचरी टीका त्यांनी केली. त्याचप्रमाणे भाजपला अशी फूट पाडण्याची आवश्यकता नव्हती, पक्षप्रमुख आणि शिवसेनेच्या आमदारांचे मतभेद झाले आणि त्यातून सेनेत फूट पडली असंही म्हणात त्यांनी शिवसेनेच्या फूटीसाठी शिवसेतील मतभेद जबाबदार असल्याचा पुर्नउच्चार केला.
महत्वाच्या बातम्या :
- Arjun khotkar | “मी शिवसेना प्रमुखांशी एकनिष्ठ”; अर्जुन खोतकरांनी लावला शिंदे गटात गेल्याच्या चर्चांना ब्रेक
- Nana Patole : “हे रात्रीचं जेवण दिल्लीत आणि दुपारचं मुंबईत करतात”, नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांना टोला
- Manisha Kayande : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे – मनीषा कायंदे
- Ajit Pawar | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; अजित पवार यांची मागणी
- Pankaja Munde | पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्स वरून भाजपचे नेते गायब
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<