इंदुरीकरांवर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, तृप्ती देसाईंचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा : ‘इंदुरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य अत्यंत बेताल असून ते आपल्या कीर्तनामध्ये नेहमीच स्त्रियांवर, महिलांवर अपमानस्पद बोलत असतात. स्त्रियांच्या लैंगिकतेवर बेताल बोलणाऱ्याला कोठेतरी लगाम घालणे आवश्यक आहे. आधी संभाजी भिडे आणि आता इंदुरीकर यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. स्त्रियांबद्दल असे बेताल बोलणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरव लागेल, असा निर्वाणीचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

दरम्यान, कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading...

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या झालेल्या प्रत्येक कीर्तनाचा व्हिडिओ हा ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या यूट्यूब चॅनेलद्वारे ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येतात. ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात, असे विधान इंदुरीकर यांनी एका ४ जानेवारीला यूट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या त्यांच्या कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये केले होते.

या संदर्भात एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दाखल घेत अहमदनगर मधील पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आली. या बैठकीमध्ये इंदुरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. पुरावे कोणी सादर केल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी प्रदीप मुरंबीकर दिली आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन