fbpx

भारताने POK ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही युद्ध करू : इम्रान खान

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारच्या कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानची चांगलीचं दाणादान झाली आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सैरभैर झाले आहेत. आज 14 ऑगस्ट या स्वतंत्र दिनानिमित्त इम्रान खान यांनी पाक व्याप्त काश्मीरला (POK) भेट दिली. यावेळी त्यांनी तिथल्या संसदेला संबोधित केले. तर भारताने pok ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं इम्रान खान म्हणाले.

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा म्हणून दिलेले कलम 370 भारताच्या केंद्र सरकारने हटवले आहे. तसेच भारताने पाक व्याप्त काश्मीरवर देखील हक्क सांगितला आहे. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत वक्तव्य केले आहे. त्यामुळे भारताच्या कलम 370 बाबतच्या निर्णयानंतर इम्रान खान चांगलेच भेदरले आहेत. त्यांनी आज pokमध्ये याबाबत वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले की, काश्मीरच्या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते फक्त काश्मीरवर थांबणारे नाहीत, लवकरच पाकव्याप्त काश्मीरमध्येही घुसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पुलवामानंतर भारतानं बालाकोटची मोहीम आखली होती. त्याप्रमाणेच आता ते लवकरच पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठीही प्रयत्न करतील.

तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध झाल्यास त्याला संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल. पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा हा जगातल्या प्रत्येक स्तरावर उपस्थित करत राहील. गरज पडल्यास आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाऊ, येत्या काळात लंडनमध्ये मोठी रॅली काढण्यात येणार आहे. या वेळी इम्रान खान यांनी RSS ला देखील लक्ष केले. भाजपा आणि संघाची विचारधारा मुसलमानांच्या विरोधात आहे. ते भारतात राज्य करत आहेत. आमच्याकडून प्रत्येक मंचावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. मोदींना काश्मीरचा प्रश्न महागात पडणार असल्याचंही इम्रान खान म्हणाले आहेत.