Karnataka Election; तर मी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नसती – चिदंबरम

नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

मात्र यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. ‘जर मी येदियुरप्पा असतो जर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत शपथ घेतली नसती’, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.“मी सर्वोच्च न्यायालयाला सॅल्यूट करतो. जर मी येदियुरप्पा असतो तर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होईपर्यंत शपथ घेतली नसती”, असं ट्विट चिदंबरम यांनी केलं आहे.

Shivjal