मी ‘गमतीजमती’ सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा -‘माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत गंमतीजमती करणाऱ्यांना आपण गमतीजमती केल्या तर कोणीही मदतीला येणार नाही’, असा सज्जड दम अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. आज बारामतीत साखर कारखान्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

‘माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करा, अन्यथा सिंगल वोटींगवर निवडून येणाऱ्या संचालकाचं जागेवर राजीनामा घेऊ’, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.

Loading...

‘निवडणुकीत काहीजण गमतीजमती करतात. त्यांनी आता थांबावं अन्यथा आपण गमतीजमती सुरु केल्या तर मदतीलाही कोणी येणार नाही’, असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

सुधीर मुनगंटीवारांना टोला –

शासकीय बंगला खाली न करणाऱ्या माजी मंत्र्याला टोला लगावत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘नवीन सरकार स्थापन होऊन जवळपास १०० दिवस पूर्ण झाले तरी हा बुवा अजून काय करतोय बाबा कुणास ठाऊक.’

‘जेव्हा बारामतीतले कार्यकर्ते काही कामाच्या निमित्तानं मुंबईत येतात. त्यावेळी मी नाराज होतो. मुंबईतलं घर लहान आहे. सरकार स्थापनेला जवळपास १०० दिवस पूर्ण होत आले तरी अद्याप शासकीय बंगला रिकामा झालेला नाही’, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. आज बारामतीत साखर कारखान्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवारबोलत होते.

‘बारामतीकर मुंबईत आल्यावर आपण नाराज होत असतो. मुळात आताच घर लहान आहे. येणाऱ्या लोकांना जयच्या बेडरुममध्ये बसवावं लागतं. आता तर माझ्या बेडरुममध्ये लोकांना बसवायचं राहिलंय’ असंही अजित पवार म्हणाले.

त्यामुळे अजित दादांच्या या मार्मिक टोल्यानंतर तरी बंगला न सोडणारा हा माजी मंत्री शासकीय बंगला सोडणार का ? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....