मी जर बोललो तर वादंग निर्माण होऊ शकतो – रामदेव बाबा

टीम महाराष्ट्र देशा- आरक्षणाचा हा विषय म्हणजे अशी आग आहे की त्यामुळे हात जळतील! या संदर्भात माझे काही विचार आहेत, परंतु मी जर बोललो तर वादंग निर्माण होऊ शकतो असं वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच घेतलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आरक्षण आर्थिक निकषावर असण्याच्या संदर्भात वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केलं आहे.

२४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान खासदार दानवे यांनी आयोजित केलेल्या योग शिबिरानिमित्त गुरुवारी दुपारी रामदेव बाबा यांचे जालना शहरात आगमन झाले. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते.

सोनिया तसेच राहुल गांधी यांच्याविषयी मनात वैरभाव नाही- रामदेव बाबा
माझी आणि भाजपची जवळीक आहे. परंतु सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याबद्दल माझ्या मनात वैरभाव नाही. आपण राहुल, प्रियंका त्याचप्रमाणे मनमोहन सिंग यांना भेटलो आहोत. बदल्याची भावना आपल्या मनात नाही. परंतु तरीही लोक बोलत असतात. आपण स्वभावाने राजकारणी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघात योगाचे महत्त्व सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिन त्यांच्यामुळे सुरू झाला. आपणही एकदा त्यांना मदत केली होती. त्याबद्दल त्यांनीही योग दिनाची मदत केली.