मी एकट्याने पाप केलं असेल तर फासावर जाण्यास तयार- राजू नवघरे

raju navghare

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा १४ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झाले. त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेट घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे माजी आमदार आणि सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे देखील उपस्थित असल्याचं सांगितलं आहे. आता यासर्व प्रकरणानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

यानंतर राजू नवघरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.सर्वच पक्षाच्या लोकांनी मला तिथे जायला सांगितलं. मी म्हटलं राजकीय माणसाला वर पाठवू नका. पण मला त्यांनी अखेर वर चढवलं. पुतळ्याची उंची १६ फूटांची आहे. मी तिथे पुष्पगुच्छ वाहिले आणि खाली आलो. तिथे सगळेच होते. पण माझ्या एकट्याचाच पाय तिथे लावल्याचं दाखवलं जातंय. जर मी कुठे चुकलो असेन तर त्यासाठी मी माफी मागतो. माझी यात कुठे चूक नाही असं मी मानतो. माझ्यासारखा एक कार्यकर्ता आमदार झाला, तर त्याच्याविरोधात सगळे पेटून उठायचं काम करत आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.

मला एकट्याला बदनाम केलं जात आहे. माझी चूक झाली असेल तर मी जाहीर माफी मागतो. जर मी एकट्यानेच पाप केलं असेल तर मी फासावर जाण्यास तयार आहे. पण मला बदनाम करु नका. तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमातही दाखल होणार नाही. अशी प्रतिक्रिया राजू नवघरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या