मी वेळीच सावध झालो नसतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता; मनसे नेत्याचा खळबळजनक खुलासा

mns and dhananjay munde

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

या सर्व घडामोडींमुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट निर्माण होत आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी याच महिलेविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेने आपल्याला देखील ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळेच आता हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसत आहे.

२०१० ते २०१५ याकाळात रेणू शर्मा या महिलेने कृष्णा हेगडे यांना संबंध ठेवण्यासाठी वारंवार विचारणा केली. ही महिला ब्लॅकमेल करते अशी माहिती समजताच त्यांनी तिच्या हनीट्रॅपपासून वाचण्यासाठी जो प्रयत्न या महिलेने केला तो धुडकावून लावला असा दावा त्यांनी केला आहे. मैत्री व संबंध ठेवण्यासाठी दबाव या महिलेकडून पडण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते बळी पडले नाहीत. त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली आहे.

हेगडे यांना त्यांच्या एका मित्राने वेळीच सावध केल्याचं त्यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सावध करणाऱ्या मित्राचं नाव जाहीर केलं आहे. मनसेचे नेते मनीष धुरी यांनी आपल्याला सावध केल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान, मनीष धुरी यांनी देखील आता दुजोरा दिला आहे.

‘२००८ सालात मी वेळीच सावध झालो नसतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता’ असं मनीष धुरी यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. २००८-९ च्या सालात रेणू शर्मा या महिलेने माझा नंबर मिळवून माझ्याशी संपर्क केला. नुकत्याच स्थापन झालेल्या पक्षाचा विभाग अध्यक्ष असल्याने नागरिक संपर्क करतात असा माझा समज होता. मात्र, या महिलेने माझ्याशी चुकीचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला.’

‘माझ्याशी जवळीक साधून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या महिलेने केला. गाण्याचा व्हिडीओ अल्बम बनवण्यासाठी अशाच मोठमोठ्या लोकांना हेरत होती. मी वेळीच सावध झालो होतो. विषय महिलेशी निगडित असल्याने मी पोलिसांत गेलो नव्हतो. मात्र, आता हेगडेंनी पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर मी देखील रीतसर तक्रार करणार आहे.’ असा खुलासा धुरी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

महत्वाच्या बातम्या