मी भारतात आलो तर कट्टरतावादी मुल्ला-मौलवींचं काही खरं नाही…

टीम महाराष्ट्र देशा: मी भारतात आलो तर तेथील कट्टरतावादी मुल्ला-मौलवींचं काही खरं नाही. त्यांना तातडीची सुट्टी घेऊन मक्केला पळून जावं लागेल’ अस ट्विट इस्लामी कट्टरतावादाविरोधात विश्वव्यापी मोहीम चालवणारे ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध इमाम मोहम्मद ताहिदी यांनी केल आहे. त्याचबरोबर ‘भारतात मला कुणी ऐकणारं आहे का?’, असा सवाल करत त्यांनी एक ट्विट केलं आहे. जानेवारी महिना उजाडण्याआधी माझ्या या ट्विटला १० हजार रिट्विट मिळाले तर मी भारतात येईन अस सुद्धा त्यांनी ट्विट करून स्पष्ट केल आहे.

bagdure

इमाम ताहिदी हे धर्मांध मुस्लिमांवर व मुस्लिम संघटनांवर सातत्यानं टीका करत असतात. जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला की ते जगातील इमामांवर हल्लाबोल करत असतात त्यांच्या याच उदारमतवादी धोरणामुळे त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता.

You might also like
Comments
Loading...