रस्त्यावर नमाज पठन होते मग; जन्माष्टमीवर बंदी घालण्याचा हक्क मला नाही; योगी

yogi adityanath on namaj

उत्तर प्रदेशातील सत्तारोहणापासूनच धडाकेबाज आणि वादग्रस्त निर्णयांमुळे चर्चेत असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू सणांच्या संदर्भात नवी भूमिका मांडल्याने चर्चा सुरु आहे जर ईदच्या काळात मी रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांना रोखू शकत नसेन, तर राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करू नका, असे सांगण्याचा कोणताही हक्क मला नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे . सायंटिंफिक कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

आगामी काळात उत्तर प्रदेशात होणाऱ्या कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विचार मांडले. सर्व जाती धर्माच्या लोकांना सण-उत्सव साजरा करण्याचं स्वातंत्र्य आहे. ख्रिस्मस साजरा करा किंवा नमाज पढा, काहीही करा, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून करा, असं योगी म्हणाले.