‘व्हॅलेंटाईन डे’ला हिंदुत्ववादी संघटनांनी अडविल्यास कामदिवस साजरा करत असल्याचे सांगा – शशी थरूर

Shashi Tharur

टीम महाराष्ट्र देशा – आज जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ उत्साहाने साजरा केला जात आहे. तसाच तो भारतातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन ‘डे’ला विरोध करणाऱ्या वर काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर निशाणा साधला आहे.

व्हॅलेंटाईन ‘डे’च्या शुभेच्या देताना शशी थरूर यांनी म्हंटले आहे की, जर संघ परिवाराने तुम्हाला आज ट्रोल केले किंवा मित्र- मैत्रिणींसोबत बाहेर न फिरण्याची धमकी दिली, तर त्यांना सांगा की तुम्ही पारंपारिक कामदिवस साजरा करत आहात.

व्हॅलेंटाईन ‘डे’ला विरोध करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांवर काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर निशाणा साधला आहे.