हिंदू एकत्र आले नाही तर देशाची फाळणी होईल- साक्षी महाराज

जबलपूर: भाजपा खासदार साक्षी महाराज म्हणाले, हिंदू एकत्र आले नाही तर देशाची फाळणी होईल तसेच श्चिम बंगालमधील परिस्थिती चिंताजनक असून जिथे जिथे हिंदू कमी झाले तिथेच दंगली होत आहेत. ते शनिवारी जबलपूरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान त्यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले.

bagdure

देशात मोदींना हटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मोदींसारखी लोकं इतिहास घडवण्यासाठी जन्माला येतात. विरोधकांची महाआघाडी झाली तरी त्यांच्यात नवरा मुलगा कोण असेल, असा प्रश्न विचारत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. काँग्रेस प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करत असल्याची टीका त्यांनी केली.

राम मंदिराबाबत भाष्य करतांना साक्षी महाराज म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराचे काम लवकरच सुरु होणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूनेच येईल. २०१९ पूर्वीच मंदिराच्या कामाला सुरुवात होईल आणि कोणीही राम मंदिराच्या कामाला रोखू शकत नाही.

You might also like
Comments
Loading...