‘विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसे केंद्राने जाहीर करावे’

sanjay

मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी तासभर पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर अर्धा तास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले कि, ‘पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता,’ असं मत फडणवीस यांनी यावेळी मांडले. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला हा टोला लगावला. राज्याला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री काल दिल्लीत गेले होते. या भेटीकडे सकारात्मकदृष्टीने पाहायला हवं. मेट्रो कारशेड अडकली आहे. त्याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यावरही सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने या भेटीचं स्वागत करायला हवं. आम्हाला या भेटीसाठी नेले असतं तर बरं झालं असतं, असं विरोधक म्हणत आहे. विरोधी पक्षाला नेण्याने जर राज्याला मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं, असं राऊत म्हणाले.

यावेळी, ‘पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता, असं मत फडणवीस यांनी यावेळी मांडले. यासोबतच, ‘मला वाटतं ही पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली असेल तर चांगले गोष्ट आहे. मोदींचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या भेटी होत होत्या, असे संबंध असले पाहिजे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल. राजकारणात जर तरला अर्थ नसतो. ते सत्तेत आहेत आम्ही विरोधात आहोत, हेच सध्या सत्य आहे,’ असं फडणवीस म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

IMP