अल्लाहने हा आजार दिला असेल तर कुठलाही डॉक्टर किंवा औषध आपल्याला वाचवू शकणार नाही : मौलाना साद

दिल्ली : धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि करोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद फरार आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मौलाना साद फरार झाला आहे. घराचीही छाडाछडती घेण्यात आली आहे. मौलाना मोहम्मद साद याच्या कथित भाषणाची ऑडिओ क्लिप बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

‘सरकारी आणि वैद्यकीय मार्गदर्शक तत्वांचे पालन करु नका’ असा मौलाना मोहम्मद साद यांचा आपल्या पाठिराख्यांना सूचना देतानाचा आवाज या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतो. लोकसत्ता आणि इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, दिल्लीतील निझामुद्दीन भागातील ‘मरकज’मधील ‘तबलिगी जमात’ या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर देशातील विविध राज्यांत परत गेलेले अनुयायी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना युद्धपातळीवर शोधून काढावे. त्या सर्वाना विलगीकरणात ठेवावे, असे आदेश केंद्र सरकारने बुधवारी सर्व राज्य सरकारांना दिले.

नेमकं काय म्हटलं आहे या क्लिप मध्ये?

“मशिदीत एकत्र गोळा झाल्यामुळे तुम्ही मरणार असे तुम्हाला वाटत असेल तर, मी तुम्हाला सांगेन कि, यापेक्षा दुसरी चांगली जागा असू शकत नाही” असे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मौलाना साद यांनी म्हटले आहे. अल्लाहने हा आजार दिला असेल तर कुठलाही डॉक्टर किंवा औषध आपल्याला वाचवू शकणार नाही’ असे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मौलाना साद यांनी म्हटले आहे.