अंबरनाथ : राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे राज्य वाऱ्यावर आहे. दरम्यान या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्याला मंत्रीपद मिळेल यावर जोरदार चर्चा रंगली आहे. मनसेला देखील मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा सुरु होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या चर्चेला पुर्णविराम दिला होता. मात्र अमित ठाकरे यांच्या विधानामुळे या चर्चेला पुन्हा सुरवात झाली आहे.
गृहमंत्रिपद मिळाले तर शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू, पण ते देत नाहीत ना, असं मिश्किलपणे मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शुक्रवारी ते अंबरनाथला गेले होते. यावेळी त्यांनी हे विधान केले.
मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?
मंत्रिमंडळाचा विस्तार आता जुलै महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांत होऊ शकतो. यामागे ठोस कारण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पुढील तीन-चार दिवसांचे वेळापत्रक अतिशय व्यस्त आहे. आज (23 जुलै, शनिवार) पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची एक दिवसीय बैठक होती.
24 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप आणि त्यांच्या समर्थक पक्षांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एका महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीत बोलावले आहे. 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. अशा स्थितीत 25 जुलैलाही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता धूसर आहे.
राज्यातील पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार होते. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने ते पुढे ढकलावे लागले. शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी 30 जूनला झाला. ही शपथ घेऊन 22 दिवस उलटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. 18 जुलैनंतर पावसाळी अधिवेशन सुरू करण्यासाठी 25 जुलै ही नवीन तारीख देण्यात आली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराची मुहूर्तमेढ रोवली न गेल्याने आता 25 जुलैलाही अधिवेशन सुरू न होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांना आपापल्या विभागाचे काम समजून घेण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या खेचण्यामुळे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यास झालेला विलंब आता अपरिवर्तनीय आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut : आज तुम्ही घोड्यांवरून फिरताय लोकं उद्या तुमची गाढवांवरून दिंड काढतील – संजय राऊत
- Udhdav Thackray : शिवसेनेतील बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची मुलाखत, काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष?
- Anil bonde | “मुख्यमंत्री महोदय पुढे ‘उप’ लावायचं राहून जातं”; अनिल बोंडेंनीही व्यक्त केल्या भावना
- IND vs WI : निकोलस पुरनचा ‘रॉकेट थ्रो’ अन् शुबमन गिल झाला आऊट, पाहा ‘हा’ VIDEO!
- Dilip Walse Patil | “एकनाथ शिंदे यांना धमकी आल्यानंतर…” ; माजी गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<