देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता – उदयनराजे भोसले

parishad-arakshan-residency-udayanraje-maratha-bhonsale-chhatrapati_ffdd71cc-9965-11e8-86f4-8f26f26dd985

सातारा : देशभरात करोना व्हायरसचा उद्रेक सुरूच आहे. करोना रुग्णांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरूवारी देशात एकूण १.३१ लाख नवीन करोना रुग्णांची भर पडली. तर, जवळपास ८०० जणांचा मृत्यू झाला. देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

अशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी यंत्रणा जीवाचे रान करत असताना लोकप्रतिनिधी मात्र बेताल वक्तव्य करण्यात व्यस्त आहेत. यात आता भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची देखील भर पडली आहे. देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य उदयनराजे यांनी केले आहे. देशात लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत देखील उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, ‘सध्या वातावरणात अनेक व्हायरस आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार’, असा प्रश्न देखील उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या