fbpx

सर्वांनी एकत्रीत प्रयत्न केल्यास राज्यात काँग्रेसचे सरकार येईल : खर्गे

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना सध्या वेग आला आहे. अशातच सर्वांनी एकत्रीत प्रयत्न केल्यास राज्यात नक्कीच काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला आहे.

बाळासाहेब थोरात आणि इतर कार्याध्यक्ष यांच्या पदग्रहण समारंभ पार पडला. या वेळी बोलताना खर्गे यांनी ‘काँग्रेस पक्षाच्या सरकारांनी महाराष्ट्र घडवला आहे. राज्यातल्या प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. सर्वांनी एकत्रीत प्रयत्न केल्यास राज्यात नक्की काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला. तसेच पुढे बोलताना मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वांना सोबत घेऊन चांगले काम केले. जनतेच्या प्रश्नावर आंदोलने केली प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. पण दुर्देवाने फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात अनपेक्षित निकाल लागले अस खर्गे म्हणाले.

दरम्यान पुढे बोलताना, नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीचा देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न आहे. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे असाही आरोप खर्गे यांनी भाजपवर केला.