एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?

टीम महाराष्ट्र देशा : येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकनाथ खडसे यांच्या ‘भोसरी एमआयडीसी’ प्रकरणी ‘झोटिंग कमिटी’चा अहवाल सरकारकडून सभागृहासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. या अहवालातून एकनाथ खडसे यांचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे सरकाने येत्या २४ फेब्रुवारीपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे.

या अधिवेशनात एकनाथ खडसे यांनी स्वत:हून हा अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती. मात्र, फडणवीस यांच्या काळात हा अहवाल प्रसिद्ध होऊ शकला नव्हता. त्यामुळे खडसे यांचे राजकीय पुनर्वसन रखडले होते. मात्र, आता महाविकासआघाडीकडून हा अहवाल सभागृहात मांडून देवेंद्र फडणवीस यांना शह दिला जाऊ शकतो.

Loading...

तर दुसरीकडे एमपी मिल कम्पाऊंड घोटाळ्यातील प्रकाश मेहतांविरोधातला लोकायुक्तांचाही अहवालही सभागृहात मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकारने दडवलेल्या या दोन चौकशी अहवालातून काय बाहेर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळातही विरोधकांच्या पाठी चौकशांचे शुक्लकाष्ठ लावून त्यांना शांत ठेवण्याची खेळी खेळण्यात आली होती. आता महाविकासआघाडीकडूनही याच फॉर्म्युलाचा वापर होताना दिसत आहे.त्यामुळे काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका