मतभेद असले तरी समर्थन द्यावे लागते, नारायण राणेंनी व्यक्त केली खंत

नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण यांच्या इंग्रजी आत्मचरित्र ‘नो होल्ड्स बार्ड’ आणि ‘झंझावात’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही उपस्थित होते.

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी आमदार झालो तेव्हा मंत्री व्हायचं होतं. मंत्री झालो तेव्हा मुख्यमंत्री बनायचं होतं. ते झालो. आता खासदार झालो पण माझ्या मर्जीने झालो नाही. माझ्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया जातोय. पटत नसलं तरी समर्थनार्थ बोलावं लागतं आहे, अशी खंत व्यक्त केली. तसेच या आत्मचरित्राविषयी माहिती दिली.

तसेच पुढे बोलताना त्यांनी मी जेव्हा सांगितलं गडकरींना सांगितले की पुस्तक प्रकाशन आहे त्यावेळी ते व्यस्त होते. परंतु त्यांनी तात्काळ वेळ दिली. आपल्या मित्राला आनंद होईल असं वागले. मंत्री विनोद तावडे आणि आशिष शेलार एका फोन वर आले. तटकरे फोन न करता आले. मुख्यमंत्र्यांकडे पुस्तक प्रकाशनासाठी वेळ मागितला पण दिला नाही असंही राणे म्हणाले.

दरम्यान या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले पण कार्यकाळ कमी मिळाला, त्यांना जर पूर्ण कार्यकाळ मिळाला असता तर महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री मिळाला असता. राणे यांना शिवसेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अन्याय सहन करायचा नाही, हा त्यांचा स्वभाव त्यांना शिवसेनेत स्वस्थ बसू देत नव्हता असं विधान केले.