मुंबई : ९ जूनला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून जवळ असलेल्या शास्त्री नगर मध्ये एक अनधिकृत इमारत ढासळली. यामध्ये ४० वर्षीय तरुणाचा बळी गेला असून १७ जण जखमी झाले आहेत. या घटनेसंदर्भात नितेश राणे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.
मुंबई मध्ये ४० फुटांवर बांधकाम करायला बंदी आहे. पण मतांच्या राजकारणासाठी मुंबई बाहेरून आलेल्या लोकांसाठी बांधकामाला हे आपलेच नगरसेवक परवानगी देत आहेत. आणि या सगळ्याला आपली मूकसंमती आहे का ? हा प्रश्न जनतेच्या मनात असल्याचं नितेश राणे म्हणालेत.आपण जनेतेचे मुख्यमंत्री आहात की विशिष्ट राजकीय पक्षांच्या पदाधिकारी नगरसेवकांचे आहात असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
महत्त्वाच्या बातम्या –