संकट आलं म्हणजे काय नाउमेद व्हायचं नसतं – शरद पवार

ncp shard pawar

टीम महाराष्ट्र देशा :  संकट आलं म्हणजे काय नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं, आज सबंध महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. आज काळ कठिण आहे मात्र आपण हरायचं नाही. दुष्काळासंबंधी राज्य सरकारकडून मदत घेऊ आणि आपण सर्व मिळून पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून प्रयत्न करू. असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल आहे. ते सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या चिलेवाडी व नागेवाडी या गावात दुष्काळ पाहणी दौऱ्यात बोलत होते.

पाऊस उशिरा येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे, नंतर पाऊस चांगला पडेल असं म्हटले जात आहे. पाऊस चांगला पडो पण आपण त्यासाठी तयार रहायला हवं. पावसाचा थेंब न थेंब वाचवून पाण्याचे योग्य ते नियोजन करायला हवे. पाणी फाऊंडेशन सध्या राज्यभरात चांगले काम करत आहे त्यांना गावकरी मदत करतात हे पाहून समाधान वाटत आहे. हे सुरूच ठेवलं पाहिजे किंबाहुना आपण हे वाढवलं पाहिजे. असं देखील पवार म्हणाले आहेत.

आज अनेकांमध्ये टँकरची मागणी आहे. रेशन कार्डवर धान्य मिळत नाही अशी तक्रार देखील केली जात आहे. चारा छावणीऐवजी गावातच चारा डेपोची व्यवस्था व्हावी अशा विविध मागण्या जनता करत आहे. आम्ही या सर्व गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवू असे आश्वासन सुद्धा शरद पवारांनी दिले आहे.