2019 मध्ये कॉंग्रेस जिंकल्यास मी पंतप्रधान होवू शकतो – राहुल गांधी

rahul gandhi

टीम महाराष्ट्र देशा: २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास आपण पंतप्रधान होवू असा विश्वास कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकमध्ये आयोजित प्रचार सभे दरम्यान  ते पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यांनतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदावर दावेदारी केली आहे .

कर्नाटक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे, भाजप तसेच कॉंग्रेस नेत्यांकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. कर्नाटकची निवडणूक हि दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. २०१९ च्या निवडणुका पाहता कर्नाटक निवडणूकीच्या निकालाने देशाच्या राजकारणावर प्रभाव पडणार आहे. दरम्यान, बंगळूरूमध्ये बोलत असताना राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कॉंग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आपण पंतप्रधान होवू असा दावाही त्यांनी केला आहे.