…तर विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा असता – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेच्या निकालाने राजकारणचं बदलून गेले. ‘अब की बार २२० पार’ भाजपच्या या महासंकल्पनेला महाआघाडीने राखले. याबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील भाष्य केले. ते पुणे येथे बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘इच्छाशक्ती असेल तर काहीही घडू शकते. यामुळे महाविकास आघाडी उदयाला आली. विधानसभा निवडणुकीत पवार साहेबांसारखा झंझावात काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवला असता तर आज वेगळे चित्र दिसले असते, असे वक्तव्य पवार यांनी केले.

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘सगळ्यांनी मनापासून काम केले असते तर खडकवासल्याची जागाही राष्ट्रवादीने जिंकली असती. मात्र, आता जे गेले त्यांना परत घेण्याच्या भानगडीत पडू नका. कुणावाचून कुणाचं अडत नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांची इच्छा असेल तर राष्ट्रवादीत स्वागतच करू, असे विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तर आपल्या मंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या