fbpx

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतल्यास महाविद्यालयावर होणार फौजदारी कारवाई

टीम महाराष्ट्र देशा- मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित महाविद्यालयावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा सामाजिक न्याय आणि विशेष सहायक मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिला आहे. औरंगाबाद विभागात, राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा खाडे यांनी काल घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती तसंच मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी तातडीनं करुन कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही खाडे यांनी यावेळी दिले.