मुख्यमंत्री बदलल्यास पाठिंबा काढू; सहा अपक्षांचा इशारा

मराठा समाजाला आरक्षण देण्यास देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याची केला दावा

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत अस्ल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल करून एकच खळबळ उडवून दिली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले तर अपक्ष आमदार सराकरसोबत राहणार नसल्याचा अपक्ष आमदार रवी राणा यांनी इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचाही दावा यावेळी राणा यांनी केला.रवी राणासह सहा अपक्ष आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत.

महाराष्ट्रात एकूण सात अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी अचलपूर विधानसभाचे अपक्ष आमदार बच्चू कडू वगळता इतर सहा आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे आहेत. यामध्ये रवी राणा, गणपत गायकवाड, किशनराव जाधव पाटील आणि शिरीष चौधरी यांचा समावेश आहे. या गटाचे नेतृत्व रवी राणा करत आहेत.

मराठ्यांचे रौद्र रुप – कुर्डूवाडी पंढरपुर रोडवर एस.टी तोडफोड सत्र सुरुच

नेमकं काय म्हणाले अपक्ष आमदार रवी राणा ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना राज्य कसे चालवाते हे चांगले माहित आहे. त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला चांगला अनुभव आला आहे. यापुढेही ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. जर मुख्यमंत्री बददले तर आम्ही सरकारचा पाठिंबा काढू .

संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता : देवेंद्र फडणवीस

नागपूर : पाणी का तुंबले याची चौकशी करून जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करू : मुख्यमंत्री