३५० जागांचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यांवर लक्ष द्या – दिवाकर रावते

टीम महाराष्ट्र देशा: येणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३५० हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, पण याला आता शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चांगलच उत्तर दिल आहे. दिवाकर रावते म्हणाले की,”भाजप नेत्यांनी पुढच्या लोकसभा निवडणुकीत ३५० हून जास्त जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी सर्वच राज्यांत भाजपला जास्त जागा जिंकाव्या लागणार आहेत, परंतु महाराष्ट्रात शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे.

शिवसेनेला वगळून भाजपला राज्यात जास्त जागाजिंकताच येत नाही. ही कमी जागांची उणीव भरण्यासाठी त्यांना इतर राज्यांवरच लक्ष देण्याची गरज आहे.” ते नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलत होते.