‘युपीत भाजपने साथ सोडली, तर केंद्रातही हात सोडणार का?’, राष्ट्रवादीचा आठवलेंना खोचक सवाल

NCP

मुंबई: उत्तर प्रदेशमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांनी यासाठी आपआपल्या तयारी सुरु केल्या आहेत. तर भाजपने स्वबळावर उत्तर प्रदेशातील निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी RPI अगोदर पासूनच एनडीए सोबत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकीत  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी भाजपने काही जागा सोडाव्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. दरम्यान यावरूनच राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी आठवलेंवर निशाना साधला आहे.

RPI चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी निवडणूक संदर्भात भाजपचे जे.पी. नद्दा यांचाशी चर्चा केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, जर भाजपने उत्तर प्रदेशात RPI ची साथ सोडली तर केंद्रातही RPI भाजपची  साथ सोडणार का? असा सवाल करत याचे उत्तर रामदास आठवले यांनी द्यावे अशी मागणी क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत केली आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशातील निवडणुकींसाठी भाजप, काँग्रेस तसेच समाजवादी पक्षाने जोरात तयारी सुरु केली आहे. आतापासूनच यासाठी नेत्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या