वर्धा : दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले जात आहेत. अशातच आता भाजप नेते नारायण राणे (narayan rane) यांनी वर्ध्यातील एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. एमगिरी येथील सभागृहात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.
“बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी स्वतः मला मुख्यमंत्री केलं तेव्हाही उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे लायक नाहीत” असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना लगावला. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आपसात कॉर्डीनेट साधत आहे. परंतु यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कॉर्डीनेट नसून त्यांना कॉर्डिनेटची गरजच नाही असे नारायण राणे यांनी बोलताना म्हणाले.
उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्राबद्दल काही जाण नाही. हिंदुत्वाशी गद्दारी करून निवडून आलेत आणि भारतीय जनता पक्षाशी बरोबरी करून मोदींच्या नावानी मत मागून निवडून आले असल्याचा दावा नारायण राणेंनी केला. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मध्ये मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी त्याग केला असेही ते म्हणाले. बाळासाहेब जिवंत असते तर उध्दव ठाकरे कधीही मुख्यमंत्री झाले नसते अशी टीका राणेंनी यावेळी केली.
त्याबरोबरच शिवसेनेचा अंत जवळ आला असल्याचा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला. एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेला बरेचशे धक्के दिले जात आहेत. आता फक्त मला एवढीच काळजी आहे की या धक्क्यांना उद्धव ठाकरे नीट सांभाळून घेतील का? अशी बोचरी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
महात्मा गांधींच्या स्मारक निर्मितीसाठी येत्या सहा महिन्यांत समिती स्थापन करुन येत्या अडीच वर्षात ३८ एकराच्या परिसरात स्मारक उभारले जाईल अशी माहिती देखील राणेंनी यावेळी दिली. या स्मारकाच्या माध्यमातुन युवा पिढीला महात्मा गांधी यांच्या ग्रामीण औद्योगिक प्रगतीबद्दल माहिती आणि योग्य ते प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं आश्वासन राणेंनी यावेळी दिलं.
महत्वाच्या बातम्या :
Narayan Rane | “शिवसेनेचा अंत जवळ आलाय”, नारायण राणेंचा ठाकरेंना टोला
Apple iOS 16 Update | Apple ने नुकतेच आपले iOS 16 लाँच केले आहे, काय आहे त्यात विशेष जाणून घ्या!
Eknath Shinde | जीवे मारण्याच्या धमक्यांवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्या जिवाला धोका, ‘असा’ रचलेला त्यांना मारण्याचा कट
Arvind Kejriwal | गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला