‘बाळासाहेबांनी मला मदत केली नसती तर मी जिवंत राहिलो नसतो’

मुंबई – ज्या काळात मला सर्वाधिक गरज होती त्या काळात बाळासाहेबांनी मला मदत केली नसती तर मी जिवंत राहिलो नसतो असे, अभिनेते अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. ठाकरे सिनेमाचा टीझर अमिताभ बच्चन यांच्या हस्ते लाँच करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले की, कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला दुखापत झाली होती, त्याप्रसंगी मुंबईच्या विमानतळावरून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कोणतीच रुग्णवाहिका मिळत नव्हती. त्यावेळी शिवसेनेच्या रुग्णवाहिकेतून मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंच्या विषयी बोलताना त्यांनी हि आठवण सांगितली. बाळासाहेबांनी मला मदत केली नसती तर मी जिवंत राहिलो नसतो असे, अभिनेते अमिताभ बच्चन यांनी यावेळी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे आणि माझे संबंध नेहमीच चांगले होते असही अमिताभ बच्चन यावेळी म्हणाले. बाळासाहेब ठाकरे सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.