वाचाळ मेहबूबा ; कलम ३७० रद्द केल्यास जम्मू-काश्मीरचे भारताशी नाते संपून जाईल

blank

टीम महाराष्ट्र देशा- नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांनी जवानांच्या हौतात्म्याचा अपमान केल्याचे वक्तव्य केले असताना आता काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले. काश्मीरमध्ये अत्यंत संवेदनशील असलेल्या कलम ३७० वरून मुक्ताफळे मेहबुबा यांनी उधळली आहेत.

केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यास जम्मू-काश्मीरचे भारताशी नाते संपून जाईल, असे अत्यंत बेजबाबदार विधान मेहबुबा मुफ्ती यांनी केले. श्रीनगरमध्ये बोलताना त्या म्हणाल्या, कलम ३७० हटवले तर आपल्याला परत जम्मू काश्मीरशी नव्याने नाते बनवावे लागेल आणि त्यासाठी नवीन शर्थी असतील. आपण त्यासाठी तयार आहात का? असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

तर दुसऱ्या बाजूला फारुक अब्दुल्ला यांनी तर थेट जवानांच्या हौतात्म्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुलवामा हल्ल्यामध्ये खरोखर ४० जवान शहीद झाले होते का?, मला या आकड्यावरही शंका आहे, असं वादग्रस्त अब्दुल्ला यांनी केलं आहे.