भाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही – उद्धव ठाकरे

udhav thakare vr cm

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात भाजप शिवसेनेची सत्ता असली तरी त्यांची कोणत्याच गोष्टींवर एक मत नसते हे गेली चार वर्ष जनता अनुभवत आहे. भाजप आणि शिवसेनेची गेल्या तीन दशकांपासून युती आणि  2014 पर्यंत राज्यात शिवसेनेला मोठा भाऊ म्हणून मान होता. मात्र आता भाजपने टाळीसाठी कितीही हात पुढे केला तरी कुठल्याही परिस्थितीत भाजपशी हातमिळवणी करायची नाही आणि भाजपला सत्ताही मिळू द्यायची नाही असे डावपेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आखल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.

या आधीच भाजपने शतप्रतिशतचा तर शिवसेनेने स्वबळाचा नारा झळकवत आहे त्यामुळे दोनही पक्ष आपल्या विस्ताराचा जोमानं प्रयत्न करत आहेत. शिवसेनेच्या सर्व आमदारांशी उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून चर्चा करत आहे. या सर्व आमदारांना स्वबळावर तयारी करण्याचा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला आहे अशीही माहिती आहे. एकवेळ शिवसेना स्वबळावर सत्तेत आली नाही तरी चालेल पण कुठल्याही परिस्थितीत भाजप सत्तेत नको अशी शिवसेनेची आर पार ची भूमिका आहे.

शिवसेनेचा पारंपरिक गड असलेल्या मुंबई आणि ठाण्यातही भाजपनं आघाडी मारलीय. या विभागातल्या 36 पैकी 15 विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपला विजय मिळाला. त्यामुळे शिवसेनेला घाम फुटलाय. मुंबई महापालिकेतही भाजपने 82 नगरसेवक जिंकून आणले आणि शिवसेनेचे मुंबई महापालिकेत 84 नगरसेवक. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून शिवसेनेने भाजप नकोच अशी भूमिका घेतली आहे. राज्यातल्या एकूण 288 मतदारसंघापैकी 120 जागा शिवसेना लढवणार आहे.

हा धनशक्तीवर जनशक्तीचा विजय ! – धनंजय मुंडे