fbpx

अण्णांना काय झाल तर मी तुम्हाला सोडणार नाही; छोटा पुढारी घनश्याम दरोडेचा सरकारला इशारा

टीम महाराष्ट्र देशा – गेल्या सात दिवसापासून अण्णा हजारे यांचे उपोषण चालू आहे. परंतु तरी सरकार याची दखल घेत नाही. स्वामीनाथन आयोग लागू करा , शेतकऱ्यांच्या समस्या संपवा. आज कांद्याचा भाव 1, २ रुपयांवर आहे. महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे हा राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाला आहे. त्यावेळी त्याने ही प्रतिक्रिया दिली.

अण्णा हजारे यांना काय झाल तर मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा दरोडे याने शासनाला दिला आहे. अण्णांची तबेत खालावत आहे. शासनाने यावर लवकर उपाय शोधून हे उपोषण सोडवावे अशी मागणी दरोडे याने शासनाकडे केली आहे.

केंद्राने लोकपाल कायदा केला. परंतु चार वर्षं झाली तरी लोकपालची नेमणूक केली नाही. स्वामीनाथन आयोगाचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दीड पट भाव दिल्याचं सरकार सांगत असलं तरी प्रत्यक्षात दिला असता तर शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकले नसते. आम्ही शेतकरी आणि शेतमजुरांना मासिक पाच हजार रुपये निवृत्ती वेतनाची मागणी केली होती. सरकारने मात्र वार्षिक सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असं अण्णा हजारे यांचे म्हणण आहे.