ये सब बातें प्राइवेट में होती तो.! द्रविडचा मेल सार्वजनिक केल्याने वसीम जाफरने टोचले पीटरसनचे कान 

पित्तरसून

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.

दरम्यान, श्रीलंकाविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली असून इंग्लंडने २-० ने यजमान संघाचा व्हाईटवॉश केला आहे. यानंतर इंग्लंडला भारताचा दौरा करायला आहे. या दौऱ्यात त्यांना ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचे सलामीवीर डॉम सिब्ले आणि जॅक क्राऊले फिरकी गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करताना दिसले.

हे पाहून खुद्द केविन पीटरसन त्यांच्या मदतीसाठी धावून आला होता. यासाठी पीटरसनने राहुल द्रविडने आपल्याला पाठवलेला इमेल सोशल मीडियावर शेअर केला होता. पीटरसनची ही बाब माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांना पटली नसून त्यांनी सोशल मीडियावर मीम शेअर करत पीटरसनला ट्रोल केले आहे.

एकेकाळी मदत लागल्याने परिस्थिती माहित असलेल्या पीटरसनने इंग्लंडचे सिब्ले आणि क्राऊले यांना मदत देऊ केली होती. त्याने ट्विट करत द्रविडने त्याला लिहिलेला इमेल शेअर केला होती. त्याआधी पीटरसनने ट्विट केले होते की ‘क्राऊले आणि सिब्लेला द्रविडने मला पाठवलेला इमेल शोधण्याची गरज आहे, ज्यात फिरकी गोलंदाजी खेळण्याबद्दल सल्ला दिलेला आहे. त्यानंतर माझा खेळ बदलला होता.’

यानंतर पीटरसनने स्वत: द्रविडने लिहिलेल्या इमेलचे फोटो शेअर करताना म्हटले होते की ‘इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याची प्रिंट काढून सिब्ले आणि क्राऊलेला द्यावी. त्यांना गरज वाटल्याच चर्चा करण्यासाठी ते मला संपर्क करु शकतात.’

अशाप्रकारे पीटरसनने द्रविडने आपल्याला पाठवलेला मेल सार्वजनिक केल्याचे कृत्य भारतीय दिग्गज जाफर यांना आवडले नाही. त्यामुळे आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे मीम शेअर करत त्यांनी पीटरसनचे कान टोचले आहेत. जाफर यांनी मिर्झापूर वेब सीरिजमधील एका दृश्याचा फोटो केला आहे. त्यावर ‘या सर्व गोष्टी खासगीच ठेवल्या असत्या तर चांगले झाले असते’, असे हिंदिमध्ये लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या