‘आप’ने पुरावे दिले तर मी राजकारणातून निवृत्त होईल

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशातील राजकीय वातावरण खूपच तापले आहे. सगळेच नेते एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आम आदमी पार्टीकडून करण्यात येणाऱ्या आरोपाला भाजपचे नेते गौतम गंभीर यांनी उत्तर दिले आहे.

आपचे उमेदवार अतिशी यांनी गौतम गंभीरवर वेगवेगळे आरोप केले होते ते ऐकून गंभीर चांगलेच नाराज झाले आहेत, त्यांनी आता थेट ‘आप’ला आव्हान दिलं आहे. ‘जर त्यांच्याकडे पुरावा असेल, तर मी तत्काळ राजकारणातून निवृत्त होईन. त्यांनी २३ मेपर्यंत पुरावा दिला, तरी मी राजकारण सोडून देईन. पण जर अरविंद केजरीवाल यांनी पुरावे दिले नाहीत, तर २३ मेनंतर ते राजकारण सोडतील का?’ असा सवाल गंभीरने उपस्थित केला.

पुढे बोलताना त्यांनी ‘माझ्या २ मुली आहे. मी महिलांची इज्जत करतो, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. एवढ्या खालच्या पातळीला कोणी कंस जाऊ शकतं? मला लाज वाटते की हे माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करेन’, असा इशारा गंभीरने दिला आहे.

दरम्यान, ‘एक महिला आणि आपल्या सहकाऱ्याच्या अपमान करण्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या कृत्याची निंदा करतो. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही हे करत आहात का? केजरीवाल यांच्यासारखा मुख्यमंत्री दिल्लीला लाभला असल्याची मला लाज वाटते’, अशी टीका गंभीरने केली आहे.