fbpx

‘राज्यातील १६ भ्रष्ट्राचारी मंत्र्यांची चौकशी केली तर मुख्यमंत्र्यांना पारदर्शी समजू

टीम महारष्ट्र देशा – राज्यातील भ्रष्ट १६ मंत्र्यांच्या घोटाळ्यांची चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी केली तर मुख्यमंत्र्यांना आम्ही पारदर्शी समजू तसेच जर चौकशी झाली नाही तर तुम्हीसुद्धा यात सहभागी होतात असे म्हंटलेले वावगे ठरणार नसल्याचे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे.

राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा कराड येथे मंगळवारी पोहचली होती. यावेळी कराड येथे पत्रकारंशी सवांद साधताना धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे.

यावेळी मुंडे म्हणले की, ‘राज्यातील भ्रष्ट १६ मंत्र्यांच्या घोटाळ्यांची चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी केली तर मुख्यमंत्र्यांना आम्ही पारदर्शी समजू तसेच जर चौकशी झाली नाही तर तुम्हीसुद्धा यात सहभागी होतात असे म्हंटलेले वावगे ठरणार नाही.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील आदि नेते उपस्थित होते.